पिंपरी– काही दिवसांपूर्वीच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी परिमंडळ दोनचा पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या हद्दीतील चार पोलीस ठाण्यातील 12 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार केले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स ही मोहीम राबवली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्याबाबत परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आले होते. त्यानुसार वाकड आणि देहूरोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठविले. गुन्हेगारांची पार्श्वभूमी पडताळून तब्बल 12 गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार करण्यात आले आहे. हिंजवडी, वाकड, देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे गुन्हेगार असून त्यांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यातील सुधाकर शिवाजी लिमकर (रा. पुनावळे, पुणे), तुषार महादु बावकर (रा. मुळशी पुणे) यांना तडीपार करण्यात आले. तर वाकड पोलीस ठाण्यातील इरफान जमशेर खान (रा. थेरगांव, पुणे), स्वप्निल उर्फ भोन्या प्रकाश घाडगे (रा. म्हातोबानगर, वाकड, पुणे), सुनिल विश्वनाथ ठाकुर (रा. रहाटणी, पुणे), दिपक बाळू धोत्रे (रा. निगडी, पुणे) यांना तडीपार केले. तसेच देहूरोड पोलीस ठाण्यातील समीर अकबर शेख (रा. थेरगांव, पुणे), शुभम उर्फ राजु राजेद्र तरस (रा. किवळे, पुणे), अमीर बाडी समीर शेख (रा. गांधीनगर, देहूरोड, पुणे) सत्वील चित्रा स्वामी (रा. देहुरोड, पुणे), कमल बाबु हिरेमठकर (रा, देहुरोड, पुणे), तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील सदानंद अरुण चव्हाण (रा. परंदवडी, मावळ, पुणे) यांनाही तडीपार करण्यात आले आहे.