Satara: जिल्ह्यात ११८ गावे, ३९४ वाड्या तहानलेल्या! प्रशासनाकडून ४७ विहिरी व २५ बोअरवेलचे अधिग्रहण
Satara काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. तरी पाणीपातळी वाढण्यास त्याची मदत होत नाही.

Satara: जून महिना संपत आला तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सध्या माण, खटाव, वाई, पाटण, कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, फलटण तालुक्यातील ११८ गावे, ३९४ वाड्यांना ११० टँकरने पाणी पुरवठा होत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. तरी पाणीपातळी वाढण्यास त्याची मदत होत नाही. माण तालुक्यात ४८ गावे व २८५ वाड्यांमध्ये शासकीय ३ व खासगी ४७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावर ६६ हजार ८२२ लाेकसंख्या व ९१ हजार ७८४ पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात ७ गावे, ८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर ६ हजार ६७० लाेकसंख्या व ८ हजार ५९५ पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यात १ गाव व ८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत असून २ हजार ३८९ लाेकसंख्या व १ हजार ४८० पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे.
खटाव तालुक्यात ३० गावे व ५८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत असून ३३ हजार ३५९ लाेकसंख्या व ५ हजार ६२८ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यात एका गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ५०६ लाेकसंख्या व १८८ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्यात २३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असून ३१ हजार ९१ लाेकसंख्या व १७ हजार ६१० पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. महाबळेश्वर तालुक्यात दोन गावात टँकरने पाणीपुरवठा होत असून ४४० लाेकसंख्या व ८५ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे.
फलटण तालुक्यात ६ गावे व ३६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु असून ११ हजार १११ लाेकसंख्या व ६ हजार १७६ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ४७ विहिरी व २५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.





