पिंपरी, (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी (दि. २३) दिवसभरात चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातून २३ व्यक्तींनी ४५ उमेदवारी अर्ज नेले. तर, भोसरी विधानसभा निवडणूक कार्यालयातून १० व्यक्तींनी १७ उमेदवारी अर्ज नेले. पिंपरी मतदार संघातून २५ व्यक्तींनी ४८ उमेदवारी अर्ज घेतले. चिंचवड, भोसरी आणि पिंपरी मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयातून अनेक व्यक्तींनी उमेदवरी अर्ज घेतले असले तरी अद्याप एकाही इच्छुकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभेसाठीच्या थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातून आज बुधवारी दिवसभरात २३ उमेदवारी अर्ज नेली आहेत. आतापर्यंत ३७ व्यक्तींनी तब्बल ८० उमेदवारी अर्ज नेली आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून आज दिवसभरात १० व्यक्तींनी १७ उमेदवारी अर्ज नेली आहेत. मंगळवारी (दि. २२) १४ व्यक्तींनी २५ उमेदवारी अर्ज नेली आहेत. त्यामुळे दोन दिवसांत २४ व्यक्तींनी घेऊन गेलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या आता ४२ झाली आहे. तर, पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयातून आज दिवसभरा २५ व्यक्तींनी ४८ उमेदवारी अर्ज घेतली आहेत. मंगळवारी (दि. २२) पिंपरी निवडणूक कार्यालयातून २९ जणांनी ५९ उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे पिंपरी निवडणूक कार्यालयातून विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या आता १०७ झाली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जांची विक्री ही पिंपरी विधानसभा मतदार संघात झाली आहे.