सांगली -सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत 11 रुग्ण करोनाबाधित झाले. जिल्ह्यात आजअखेर 78 रुग्ण करोनाणामुक्त झाले असून 57 जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण करोनाबाधितांची संख्या 139 झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांपैकी पाच रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
शुक्रवारी करोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील करगणी येथील 38 वर्षाचा पुरूष, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 75 वर्षाची महिला (पॉझिटिव्ह रूग्णाची पत्नी), कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षाची स्त्री व खरसिंग येथील मुंबईवरून आलेला 21 वर्षाचा पुरूष, शिराळा तालुक्यातील काळुखेवाडी येथील 40 वर्षाची स्त्री (मणदूर येथील पॉझिटिव्ह रूग्णाची मुलगी), तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ठाण्यावरून आलेला 19 वर्षाचा पुरूष, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील मुंबईवरून आलेला 35 वर्षाचा पुरूष व साळसिंगे येथील 55 वर्षाची महिला (पॉझिटिव्ह रूग्णाची पत्नी), मिरज तालुक्यातील मालगांव येथील पनवेलवरून आलेली 50 वर्षाची महिला, जत येथील 35 वर्षाचा पुरूष यांचा समावेश आहे.