शिरूर- शिरूर तालुक्यातील 9 गावांत 11 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. शिरूर तालुक्यातील शिरूर शहर 3, कारेगाव 1, सोनेसांगवी 1, शिरूर ग्रामीण 1, वरुडे 1, रांजणगाव गणपती 1, शिक्रापूर 1, कासारी 1, विठ्ठलवाडी 1 असे एकूण 11 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शिरूर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.