पिरंगुट- मुळशी तालुक्यात आज 11 करोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 617 झाली आहे. बावधनमध्ये एक, सुसमध्ये चार, नेरे मदगय एक, म्हाळुंगेमध्ये एक, उरावडेमध्ये एक, दखणेमध्ये एक, कासारआंबोलीमध्ये एक, कासारसाईमध्ये एक असे 21 रुग्ण आढळले आहेत. सध्या रुग्णालयात 253 रुग्ण दाखल आहेत. 43 रुग्णांना घरी सोडले असून आजपर्यंत 345 रुग्ण घरी परतले आहेत. आजअखेर 19 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.