दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार
Updated On:

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निकालाचे सर्व विभागांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सीबीएसई, सीआयएससीई या बोर्डांचे दहावीच्या परीक्षांचे निकाल लागलेले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना उत्सुकता लागलेली आहे. दि. 2 ते 25 मार्च या कालावधीत राज्यातील नऊ विभागीय मंडळातील एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.




