satara | डिस्कळच्या विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

पुसेगाव, (प्रतिनिधी)- डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. दीपाली संतोष जाधव ( 88.80), वैभवी गोरख शेडगे (87.40), वैष्णवी संतोष घाडगे (86.60), सोनाली रमेश निकम (84.60), सिध्दी विनोद पवार (83.80), सुयश दादासो मदने (83.80) यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळवले.
विद्यालयाचे 37 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 13 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 7 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर एका विद्यार्थ्यांला उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गोडसे, उपाध्यक्ष डॉ. अजय घाडगे, सचिव प्रा. सुनील दळवी, सरपंच डॉ. महेश पवार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ तसेच मुख्याध्यापक आर. एम. डांगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.





