“एसटी महामंडळाच्या प्रतीक्षा यादीतील 1058 उमेदवारांची नियुक्ती होणार”
Updated On:

मुंबई – सरळ सेवा भरती सन 2019 अंतर्गत अतिरिक्त प्रतीक्षा यादीवरील एकूण 1058 उमेदवारांची नियुक्ती रखडली होती. या संदर्भात संबंधित उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची भेट घेऊन नियुक्त्या करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते.
या निवेदनाची गंभीर दखल घेऊन भरत गोगावले यांनी संबंधितांना तातडीने नियुक्त्या देण्याच्या सूचना दिल्या. यानंतर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.





