PIB Fact Check : हजार रुपयांची नवी नोट येणार? RBI कडून स्पष्टीकरण जारी
PIB Fact Check : सोशल मीडियावर १,००० रुपयांची नवी नोट येणार असल्याचा दावा व्हायरल आहे. RBI ने अशी कोणतीही घोषणा केलेली नसल्याचे PIB फॅक्ट चेकने स्पष्ट केले.

PIB Fact Check : सोशल मीडियावर सध्या १,००० रुपयांची नवी नोट पुन्हा चलनात येणार असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही पोस्ट, फोटो आणि व्हिडिओमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नव्या १,००० रुपयांच्या नोटा जारी करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केले आहे.
PIB फॅक्ट चेकनुसार, RBI ने १,००० रुपयांची नवी नोट जारी करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये. चलनाबाबत कोणताही बदल झाल्यास त्याची अधिकृत माहिती RBI किंवा सरकारकडून दिली जाते.
नोटबंदीनंतर हजाराची नोट बंद
नोव्हेंबर २०१६ मधील नोटबंदीत ५०० आणि १,००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर नव्या डिझाइनच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि २,००० रुपयांची नोट चलनात आली. मात्र, १,००० रुपयांची नवी नोट पुन्हा आणण्याबाबत RBI किंवा केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, २,००० रुपयांची नोटही चलनातून परत घेण्यात आली आहे.
🚨 FAKE ₹1,000 NOTE ALERT!
Several social media posts claim that a new ₹1,000 note has been issued.
#PIBFactCheck
❌ This claim is fake.
✅ The @RBI has made no announcement regarding the issuance of a new ₹1,000 note.
🔸 Verify information through official sources and do not share unverified claims.
💡 Come across suspicious content related to the Central Government? Report it to @PIBFactCheck.
📲 +91 8799711259
📩 [email protected]— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 27, 2026
व्हायरल पोस्टपासून सावध राहा
WhatsApp, Facebook आणि X वर आलेली माहिती खरी आहे की नाही, हे तपासल्याशिवाय पुढे पाठवू नये. केंद्र सरकारशी संबंधित संशयास्पद माहितीची पडताळणी PIB फॅक्ट चेककडे करता येते.





