रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची तातडीची मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Updated On:

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अलिबाग मधील थळ याठिकाणी दाखल झाले . या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासाठी सध्या १०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. पंचनामे आले कि भरपाईचे स्वरूप ठरेल असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री अदिती तटकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली. पंचनाम्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार पुढील मदत दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. अशा संकटाला सामोरे जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील लोकांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले .





