बारामती -पवारवाडी (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीस संरक्षक भिंत बांधकाम मंजूर झाले आहे. सुमारे दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या कामाचे भूमिपूजन सरपंच रेश्मा संतोष खोमणे यांच्या हस्ते करण्यात आले.
तरडोली नजीक पवारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीस जिल्हा परिषदेकडून सुमारे दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, माजी सरपंच किसन तांबे, हनुमंत भापकर, नवनाथ जगदाळे, संतोष खोमणे, गोरख मेमाणे कैलास शिंदे, भगवान धायगुडे, ऋषीकेश पवार उपस्थित होते.