या देशातील 7 पैकी 1 प्रौढ व्यक्ती करोडपती; घराच्या मालकी पेक्षा गुंतवणुकीला प्राधान्य

या देशात कोट्याधीशांचे गुंतवणूक धोरण
स्वित्झर्लंड मध्ये सात प्रौढांमध्ये एक जण हा कोट्याधीश असतो. त्यांच्या गुंतवणूक विषयक व्यूहरचनेमध्ये अनेक गोष्टींचा विचार केलेला असतो. अल्पाइन पर्वतराजीतील स्वित्झर्लंड हा देश अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे कायम या देशाला जगभरातून पर्यटक भेट देत असतात. त्याखेरीज जागतिक पातळीवरील वित्तीय केंद्र म्हणूनही या देशाची ओळख आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे या देशात कोणत्या अमेरिकी डॉलरमधील कोट्याधीशांची संख्या जास्त आहे.
अमेरिकेतील कोट्याधीशांच्या प्रमाणाशी तुलना करता स्वित्झर्लंडमधील कोट्याधीशांचे प्रमाण हे पाचपट अधिक आहे. स्वित्झर्लंडमधील नागरिकांचा गुंतवणूक आणि अर्थविषयक नियोजनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामागे महत्त्वपूर्ण ठरतो.
घराच्या मालकी पेक्षा गुंतवणुकीला प्राधान्य
अमेरिकेत ज्याप्रमाणे घर घेण्याला प्राधान्य दिले जाते, तसे स्वित्झर्लंडमधील नागरिक करत नाहीत. अमेरिकेत 65 टक्के नागरिक हे स्वतःचे घर घेण्यासाठी पैसा खर्च करतात. त्या तुलनेत स्वित्झर्लंड मध्ये जेमतेम 41 टक्के लोक घर घेण्याच्या मागे लागलेले असतात. स्विर्त्झलँड मधील कोट्याधीश हे भाड्याच्या घरात राहणाऱ्या राहण्याला प्राधान्य देतात आणि त्यांच्याकडील असलेला रक्कम ही ते योग्य प्रकारे गुंतवतात जेणेकरून चांगल्या प्रकारे परतावा मिळू शकेल. हा त्यांचा व्यूहरचनात्मक दृष्टिकोन प्रचंड प्रमाणात संपत्ती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. या देशातील नागरिक घराची मालकी मिळवण्याचा पारंपारिक मार्ग न स्वीकारता भाड्याच्या घरात राहून हातात असलेली रक्कम गुंतवत असल्याने त्यांच्या संपत्ती सातत्याने वाढ होत राहते.
बचतीमधील अचूकता
बचतीबाबतचा पारंपारिक दृष्टिकोन सोडून ते स्वतःच्या कमाईतून आलेल्या रकमेपैकी ठराविक रक्कम आधी बचत खात्यात टाकतात आणि उरलेल्या पैशांमध्ये घर आणि कुटुंबाचा खर्च चालवतात. त्यामुळे बहुतेक स्वित्झर्लंडमधील कुटुंबांकडे महिन्याच्या कमाईतील 20 ते 30 टक्के रक्कम गुंतवणुकीकडे जाते आणि त्यानंतरच उरलेली रक्कम कुटुंबाच्या खर्चासाठी वापरली जाते.
कौशल्य गुंतवणुकीला प्राधान्य
या देशात कोट्याधीशांचे गुंतवणूक धोरणस्विर्त्झलँड मध्ये शिक्षण अतिशय महाग आहे. केवळ पदवी संपादन करण्यापुरतेच नव्हे तर अन्य महत्त्वाची कौशल्य प्राप्त करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात शुल्क द्यावे लागते. त्यामुळे स्वित्झर्लंडमधील व्यक्ती त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच ते दहा टक्के रक्कम स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकासासाठी गुंतवत असतो. भाषेविषयी कौशल्य, तंत्रज्ञान, अर्थविषयक साक्षरता या गोष्टी गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळेच या देशातील नागरिकांना दीर्घ काळात गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळतात.
बँकिंगमधील बहुविधता
स्वित्झर्लंडमधील कोट्याधीश व्यक्ती त्यांच्याकडील निधीचे नियोजन करण्यासाठी मल्टी बँक अॅप्रोच स्वीकारतात. स्थानिक बँकांचा वापर ते दैनंदिन व्यवहारासाठी करतात तर खाजगी बँकांचा वापर हा संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी केला जातो आणि आंतरराष्ट्रीय बँकांचा वापर हा फॉरेन एक्सचेंज आणि जागतिक पातळीवर गुंतवणुकीसाठी केला जातो.
स्विस वेल्थ फिलॉसॉफी
संपत्ती निर्माण करण्याबाबत स्विझरलँड मधील नागरिकांचा दृष्टिकोन हा अनेक मूलभूत तत्त्वांची निगडित असतो. त्यामध्ये ऑटोमॅटिक सेविंग, गरजांपेक्षा कमी खर्च करणे आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष ठेवून गुंतवणूक करत राहण्याला प्राधान्य देण्यात येते.
जागतिक गुंतवणूक व्यूहरचना
याखेरीज स्वित्झर्लंडमधील नागरिक हे संपत्तीच्या विविध वर्गवारी मध्ये गुंतवणूक करत असतात. जागतिक पातळीवरील अर्थविषयक संधी आणि जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कर सवलत मिळावी यासाठी अनेक नागरिक हे अन्य देशांमध्ये राहतात किंवा सेकंडरी पासपोर्ट मिळवतात.
जोखीम व्यवस्थापन आणि संधीचे सोने
अनेक बँकांबरोबर व्यवहार करून आणि गुंतवणुकीत बहुविधता ठेवून स्वित्झर्लंडमधील नागरीक हे त्यांच्या गुंतवणुकीतील जोखीम आणि संधी यांचे योग्य संतुलन राखत असतात.
===========





