चंदनापुरीत साकारले 1 कोटी 10 लाखांचे साई मंदिर!
Updated On:

संगमनेर – तालुक्यातील चंदनापुरीमध्ये दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा काही दिवस वास्तव्यास होते अशी माहिती जुने जानकार लोक सांगतात. त्यानुसार लोकसहभागातून येथे 1 कोटी 10 लाख रुपये खर्च करून साई मंदिर उभारण्यात आले आहे.
आज (शुक्रवार) ते गुरुवार (ता. 25) दरम्यान साईमूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा होणार आहे. सर्व दिंड्या व पायी पदयात्री, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृहासह निवासाची सुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिरासाठी कौसल्याबाई व अनसूयाबाई शिवाजी राहाणे या दोघींनी पाच गुंठे जागा मोफत दिली आहे.
आजपासून गुरुवार (दि. 25)पर्यंत या दिवसांत ग्रंथपूजन व पारायण सोहळा, श्री साई चरित्र वाचन, श्री मूर्तीची भव्य मिरवणूक, दररोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
टॅग्स:



