वाघोलीत कोविड रुग्णालयाच्या उभारणीसाठी 1 एकर जागा देणार

Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माणिकराव अमृतराव सातव पाटील यांनी वाघोली  येथील आपल्या मालकीची एक एकर जागा कोविड रुग्णालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्धार केला आहे.

वाघोली तालुका हवेली येथे नुकतीच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे  आमदार अशोक पवार, ग्रामपंचायत सरपंच  वसुंधरा उबाळे,  माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र अण्णा सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे, सुधीर भाडळे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये आढावा  बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत वाघोली येथील रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन खासदार अमोल कोल्हे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माणिकराव सातव पाटील यांनी आपल्या मालकीची एक एकर जागा कोविड रुग्णालयासाठी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या जागेत उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयातून गोरगरिबांची अल्प व माफक दरात सेवा व्हावी, रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी सातव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून एक एकर जागा देण्याचा निर्धार केल्याबद्दल वाघोली आणि पंचक्रोशी मधून सातव पाटील यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pimple Gurav : पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत इमारत जमीनदोस्त; ४३२ चौ.मी. बांधकामावर कारवाई

2026-10-07 08:24:53

Pimple Gurav : पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत इमारत जमीनदोस्त; ४३२ चौ.मी. बांधकामावर कारवाई

Industrial city : धुळीच्या विळख्यात उद्योगनगरी; बांधकामांच्या प्रदूषणाने श्वास कोंडला

2026-09-16 08:00:28

Industrial city : धुळीच्या विळख्यात उद्योगनगरी; बांधकामांच्या प्रदूषणाने श्वास कोंडला

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन

2026-09-15 15:42:59

Wagholi : वाघोलीतील महिला अत्याचार प्रकरणाला नवे वळण; आरोपीला तात्पुरता जामीन

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

2026-09-11 16:28:37

Holystico Astrana : होलिस्टिको अ‍ॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार

Wagholi : शेकोटीजवळ बसलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण; वाघोलीत दोघे तरुण अटकेत

2026-09-10 22:39:22

Wagholi : शेकोटीजवळ बसलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण; वाघोलीत दोघे तरुण अटकेत