मुख्यमंत्र्यांकडे सापडले १.८० कोटी; पैशांने मते खरेदी करण्याचा डाव, काँग्रेसचा आरोप 

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशमध्ये पैशांच्या आधारे मते खरेदी करण्याचा मोठा आरोप काँग्रेसने भाजपवर लावला आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यामध्ये १.८० कोटी रुपये सापडले आहेत. हे पैसे मतदारांना आकर्षित करण्यासाठी होते का? हा काळा पैसे नव्हता का?, असे प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत.

रणदीप सुरजेवाला म्हणाले कि, आतापर्यंत निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल करायला हवी नव्हती का? अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आजपर्यंत गुन्हा दाखल का केला नाही? या पैशांचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत होणार होता का? यावरून तुम्हाला नाही वाटत चौकीदारही चोर है , असे प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, रात्री उशिराने मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यामध्ये जवळपास १.८० कोटी रुपये सापडले. तर आज अरुणाचल प्रदेशमधील पसीघाटमध्ये नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमवेत पैसे मोजण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेस्ट हाऊसमध्ये असणाऱ्या पाच गाड्यांमध्ये हे पैसे सापडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.