Baramati : २० हजार मतदारांना १४ कोटींचे वाटप; पुरुषोत्तम जगताप यांचा गंभीर आरोप!
Baramati : २० हजार मतदारांना १४ कोटी रुपये वाटप केल्याचा दावा करतानाच, मतदारांना प्रत्येकी सात हजार रुपये दिले. टोकन म्हणून रुपयांची नोट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवल्यानंतर पराभूत उमेदवार पुरुषोत्तम जगताप यांनी पैशांच्या कथित वाटपावरून गंभीर आरोप केले आहेत. २० हजार मतदारांना १४ कोटी रुपये वाटप केल्याचा दावा करतानाच, मतदारांना प्रत्येकी सात हजार रुपये दिले. टोकन म्हणून रुपयांची नोट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
निवडणुकीतील विजयामागे अन्य कोणाचेही श्रेय नसून केवळ ‘लक्ष्मीदर्शन’ हेच कारण असल्याची टीका जगताप यांनी केली. त्यांच्या या आरोपांमुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सोमेश्वरच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला. या निकालानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी पैशांच्या कथित वापराचा मुद्दा उपस्थित केला आहे. मतदारांना पैसे दिल्याचा, त्यासाठी नोटेचा टोकन म्हणून वापर केल्याचा त्यांचा दावा असून, आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यासंदर्भात उपलब्ध पुरावे, संबंधितांची भूमिका, अधिकृत चौकशी यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोपांवर विजयी पॅनल काय स्पष्टीकरण देते. निवडणूक यंत्रणा याची दखल घेते का, याकडे आता लक्ष लागले आहे.





