Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा
Satara माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांना अभ्यासू आणि तीन दशकाची राजकीय परंपरा असल्याने स्वीकृत नगरसेवक पदी त्यांना संधी देण्यात आली होती. खासदार उदयनराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात .

Satara: भाजपच्या गटातील अनुभवी स्वीकृत नगरसेवक व खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक शंकर माळवदे यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.या राजीनाम्या मागे वैयक्तिक कारण असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले .
माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांना अभ्यासू आणि तीन दशकाची राजकीय परंपरा असल्याने स्वीकृत नगरसेवक पदी त्यांना संधी देण्यात आली होती. खासदार उदयनराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात .गेल्या सहा महिन्यांमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभांमधून प्रशासनाला आणि सत्ताधार्यांना सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विचारून तसेच प्रशासनाला त्यांच्या कामकाजामध्ये योग्य ते मार्गदर्शन करत शंकर बाळवदे यांनी आपल्या कामकाजाचा चांगलाच ठसा उमटवला होता. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी इतर मागास प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माळवदे यांच्या राजकीय कारकिर्दीत ऑलवेल सुरू असताना अचानक बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. जिल्हा प्रशासनाकडून तो स्वीकारण्यात आला.
या राजीनाम्याबाबत माळवदे यांच्याशी संपर्क साधला असता हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाला सभेच्या कार्य वृत्तांताची प्रश्न विचारून तसेच प्रशासनाच्या त्रुटी दाखवत त्यांनी सभेच्या कामकाजावर नेमकेपणाने बोट ठेवले होते.आपल्या अभ्यासू मांडणीची चुणूक त्यांनी सर्वसाधारण सभांमधून दाखवली होती. माळवदे यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.





