कोलोंबो- श्रीलंकेमध्ये संसदीय निवडणुकांसाठीच्या मतदानाला आज प्रारंभ झाला. करोनाच्या साथीमुळे दोनवेळेस निवडणुकांचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले होते.
राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष महिंदा देशप्रिया यांच्या म्हणण्यानुसार शांततेच्या वातावरणात आणि सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून झालेल्या मतदानात 70 टक्के नागरिकांनी मतदान केले.
राजपक्षे कुटुंबियांच्या श्रीलंका पीपल्स पार्टी या शक्तिशाली पक्षाला या निवडणूकीत विजय मिळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
मतदान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता बंद झाले आणि मतपेट्या मतमोजणी केंद्रांवर नेण्यात आल्या. मतमोजणी गुरुवारी होणार आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे देशप्रिया यांनी सांगितले.