शिरूर (पुणे) -रुग्ण हक्क परिषद व आधार छाया फाउंडेशनच्या वतीने तालुका व शहरातील एकूण 63 पत्रकारांना करोना योद्घा सन्मानपत्र तसेच मास्क व सॅनिटायझर देऊन सन्मानित केले.
यावेळी विश्वस्त पृथ्वी मेडिकल फाउंडेशन वर्षा काळे, रुग्ण हक्क परिषदेच्या शिरूर तालुका अध्यक्ष सविता बोरुडे, तालुका उपाध्यक्ष प्रीती बनसोडे, सचिव सुजाता रासकर, प्रसिद्धीप्रमुख अनिल सोनवणे, संपर्क प्रमुख डॉ. वैशाली साखरे, सदस्य सारिका वीरशैव, नीलम सोनवणे, सागर सारंगधर, कोमल ढेरंगे, गणेश कचरे, संस्थापिका मनस्वी महिला उन्नती संस्था वैशाली गायकवाड, रेश्मा शेख, उपस्थित होते. यावेळी शिरूर मराठी तालुका मराठी पत्रकार संघ, भारतीय पत्रकार संघ शिरूर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नॅशनल युनियन ऑफ जनरल लिस्ट शिरूर, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ या सर्व पत्रकार संघटनेच्या 63 पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.