वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांना नोटीस
Updated On:

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते व भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 29 फेब्रुवारी रोजी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
याबाबत कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम. एन. नागराज म्हणाले, आम्ही वारीस पठाण यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस बजावली आहे. 29 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून, त्यांना आपले म्हणने मांडण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, वारीस पठाण यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथील सभेत “15 कोटी आहोत, पण 100 कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा’ असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कलबुर्गी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला.





