Bomb Threat : देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) देऊन खळबळ उडवून देणा-या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रीनिवास लुईस (४७) असे या आरोपीचे नाव असून तो कर्नाटकच्या म्हैसूर येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या (Bomb Threat) विशेष पथकाने म्हैसूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर सेल करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली उच्च न्यायालय, बिहारमधील पाटणा न्यायालय आणि देशातील इतर १००० पेक्षा जास्त न्यायालयांना बॉम्बने उडवण्याचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले. या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. Bomb Threat तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दिल्ली पोलिसांनी म्हैसूरमधील वृंदावन लेआउट परिसरात छापा टाकून आरोपी श्रीनिवासला ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे. श्रीनिवास लुईस हा पदव्युत्तर असून त्याने यूजीसी-नेट ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. तो काही काळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. तपासात समोर आले आहे की, श्रीनिवासला वकील बनायचे होते. वडिलांच्या जमिनीचा वाद सोडवण्यासाठी त्याने २०१६ मध्ये एलएलबीला प्रवेश घेतला होता. परंतु, तो पदवी पूर्ण करू शकला नाही. या अपयशामुळे आणि बेरोजगारीमुळे तो मानसिक तणावात (Bomb Threat) होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण न झाल्याने आणि जमिनीचा प्रश्न मार्गी न लागल्याने त्याचा न्यायव्यवस्थेवर राग होता. याच रागातून त्याने न्यायालयांना लक्ष्य करून भीती पसरवण्यासाठी हे ईमेल पाठवले.