महापालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
पुणे : महापालिकेच्या विकास कामांमधील गैरव्यवहार तसेच निविदांमधील भ्रष्टाचारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शुक्रवारी मित्रमंडळ चौकात भांडाफोड आंदोलन करण्यात आले. पुणे सातारा रस्ता बीआरटी, जलपर्णी याची ही सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. महापालिकेतील विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम,आणि कार्याध्यक्ष दिलीप अरूंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.
माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका प्रिया गदादे, प्रदीप देशमुख, विनायक हनमघर,मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, शिवाजी गदादे पाटील, संतोष नांगरे, अश्विनी सावंत, अमोल ननावरे, वैजनाथ वाघमारे, पंडीत कांबळे, गौरी जाधव, प्रेम गदादे, संतोष पिसाळ,आनंद बाफना, दादासाहेब सांगळे, सचिन पासलकर,गणेश मोहिते, ह रुपेश आखाडे, महेंद्र गावडे, हरीश खडेकर, शांतीलाल मिसाळ, संग्राम होनराव,फारुक शेख, समीर पवार,प्रशांत कदम, साहिल तांबोळी, शिवम इभाड,स्वीकार देशपांडे अभिजीत भिसे, श्रीकांत मेमाने,प्रमोद संचेती, निलेश नवलाखा,संदीप काळे, संतोष वचने,सचिन बनसोडे, योगेश वराडे, योगेश वराडे अरुण धावरे, अभिजीत उंद्रे. प्रदीप शिवशरण, समीर पवार, सुभाष पवार, प्रवीण खत्री, मंगेश जाधव, स्वीकार देशपांडे, सचिन समेळ उपस्थित होते.
तर या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून, महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई न केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.