Shiv Sena Verdict : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; कपिल सिब्बल यांनी पकडली एकनाथ शिंदेंची ‘ती’ मोठी चूक, निकाल पालटणार?
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान (Shiv Sena Verdict) एक अत्यंत निर्णायक आणि खळबळजनक वळण आले आहे.

Shiv Sena Verdict : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान (Shiv Sena Verdict) एक अत्यंत निर्णायक आणि खळबळजनक वळण आले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुरू असलेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक आणि कायदेशीर चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर (Shiv Sena Verdict) कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर मांडत शिंदे गटाचे सर्व दावे खोडून काढण्यास सुरुवात केली आहे. सिब्बल यांच्या मते, एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र राजकीय पक्षच अस्तित्वात नसताना त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत लेटरपॅडचा वापर करून राज्यपालांना पत्र कसे दिले, हा या संपूर्ण खटल्यातील सर्वात कळीचा मुद्दा ठरला आहे.
युक्तिवाद करताना सिब्बल यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख नव्हते आणि प्रतिनिधी सभेतही ठाकरे गटाचेच बहुमत होते. अशा परिस्थितीत शिंदे यांनी स्वतःचा राजकीय पक्ष नसताना पक्षाच्या लेटरहेडवरून राज्यपालांना पत्र देणे किंवा कोणाला नोटीस बजावणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होता.
जर शिंदेंचा काही विरोध होता, तर त्यांनी पक्षाची बैठक बोलवायला हवी होती, असेही सिब्बल यांनी ठणकावून सांगितले. यासोबतच, विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष होऊ शकत नाही, असा घटनेच्या १० व्या सूचीचा दाखला देत सिब्बल यांनी भरत गोगावले यांची प्रतोद (व्हीप) म्हणून केलेली नियुक्तीच मुळात अनैतिक आणि चुकीची असल्याचा दावा केला आहे.
याच सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी बंडखोर आमदारांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदे गटाचे आमदार सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी म्हणजेच भाजपशासित राज्यांमध्ये जाऊन बसले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कामकाजाचा व्यवहार आणि पक्षाचे ठराव हे दुसऱ्या राज्यात, विशेषतः आसाममध्ये बसून कसे काय मंजूर होऊ शकतात, असा बिनतोड सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व कायदेशीर मुद्द्यांमुळे (Shiv Sena Verdict) आणि सिब्बल यांनी पकडलेल्या या तांत्रिक चुकीमुळे या ऐतिहासिक खटल्यात मोठा ट्विस्ट आला असून आता न्यायालय काय निकाल देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






