Richa Agnihotri: रिचा अग्निहोत्रीने गुपचूप उरकले लग्न; सुंदर लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष
Richa Agnihotri: रिचा हिचा नॅचरल ब्रायडल लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस

Richa Agnihotri: मराठी टेलिव्हिजन आणि सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री रिचा अग्निहोत्रीने गुपचूप लग्न केलं आहे . रिचाने अथर्व गोडसे याच्यासोबत सप्तपदी घेत वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
डिसेंबर महिन्यात रिचा आणि अथर्व यांनी साखरपुडा केला होता. काही दिवसांपूर्वीच रिचाने तिच्या मेहेंदी आणि हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओही शेअर केले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नातील फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.चाहत्यांनी कमेंट्समध्ये दोघांच्या सुंदर जोडीचे कौतुक केले आहे. Richa Agnihotri
लग्नसोहळ्यात रिचा अग्निहोत्रीचा सिंपल मेकअप लुक विशेष चर्चेत राहिला. आयुष्यातील या खास क्षणासाठी रिचाने भरजरी लेहेंगा घातला होता. पारंपरिक साडी, नथ आणि दागिन्यांसोबत हा मिनिमल मेकअप लुक अतिशय सुंदर दिसत होता. (Richa Agnihotri)
आजकाल अनेक वधू साधेपणाला प्राधान्य देताना दिसतात आणि रिचानेही त्याच ट्रेंडचे अनुसरण केल्याचे पाहायला मिळाले. तिचा हा नॅचरल ब्रायडल लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. तर तिचा पती अथर्वने सूट परिधान केला होता.
दरम्यान, रिचा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कथ्थक डान्सरही आहे. ती ‘मिस ठाणे’ स्पर्धाही जिंकली होती. ‘ढोलकीच्या तालावर’ या रिएलिटी शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर सिनेमातही ती झळकली आहे. Richa Agnihotri
हेही वाचा:
Operation Tiger : अखेर फोटो आला समोर! ठाकरे गटातील फुटीर खासदारांसोबत दिसणारी ‘ती’ व्यक्ती कोण?






