लोणंद – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील पाच दिवसांच्या प्रवासासाठी टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात येथे आज दुपारी दीड वाजता दाखल झाला. सायंकाळी समाजआरती होऊन पालखी सोहळा लोणंद मुक्कामी विसावला. नीरा नदीवरील दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घातल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने माउलींच्या रथाचे स्वागत पाडेगाव येथे करण्यात आल्यानंतर पालखी सोहळा पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद शहरात दाखल झाला. नगरपंचायत चौकात नगरपंचायतीच्यावतीने माउलींचे स्वागत करण्यात आले. यावेळी लोणंदच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुख्याधिकारी दतात्रय गायकवाड, नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील, आनंदराव शेळके पाटील, सचिन शेळके, गनीभाई कच्छी, प्रवीण व्हावळ, सुप्रिया शेळके, मधुमती पलंगे, राशिदा इनामदार, भरत बोडरे, भरत शेळके, सागर शेळके, दीपाली निलेश शेळके, आसिया बागवान, तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, दीपाली संदीप शेळके, ज्योती डोनीकर, तसेच ॲड. गजेंद्र मुसळे, सर्फराज बागवान, हर्षवर्धन शेळके, तारीक बागवान, नगरपंचायत कार्यालय अधीक्षक शंकर शेळके, सागर मोटे, रोहित निंबाळकर, पोपटराव क्षीरसागर, विजय बनकर, बाळकृष्ण भिसे, वैजनाथ गाडे, श्रद्धा गर्जे, शाहीन सय्यद, रवींद्र डोईफोडे, राजेंद्र डोईफोडे, राजेंद्र रासकर, संदीप जाधव, प्रशांत नेवसे आदी मान्यवर उपस्थित होते. पालखी सोहळा तानाजी चौकात पोहचल्यानंतर माउलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेऊन लोणंदकर ग्रामस्थांनी वाजतगाजत साडेपाचच्या सुमारास पालखीतळावर पोहचवली. पालखीतळावर सर्व पालख्या गोलाकार उभ्या केल्यानंतर चोपदारांनी दंड उंचावल्यानंतर सर्व दिंड्या शिस्तीत उभ्या राहिल्या. यानंतर वारकऱ्यांना सूचना देण्यात आल्यानंतर सायंकाळची समाजआरती होऊन लोणंद मुक्कामी पालखी सोहळा विसावला. यानंतर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सातारा, कराड, सांगली, कोल्हापूरपासून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली. पालखी सोहळ्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभारी बंदोबस्त अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल तसेच सहाय्यक बंदोबस्त अधिकारी उपअधीक्षक राहुल धस, लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी नीरा विसावापासून लोणंद अशी बंदोबस्ताची व्यवस्था केली. तसेच संपूर्ण पालखी काळात वेगवेगळ्या पथकांद्वारे लोणंद, फलटण व बरडपर्यंतच्या पालखी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले.