प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आम आदमी पार्टीने प्रभाग क्रमांक २६ मध्ये आपला प्रचार अधिक तीव्र केला असून, नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने घराघरांत पोहोचणाऱ्या प्रचारामुळे पक्षाचा संदेश प्रभावीपणे पोहोचताना दिसत आहे. प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येत असून, परिसरातील पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात येत आहेत. या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचा विश्वास आम आदमी पार्टीकडून देण्यात येत आहे.आपचे उमेदवार रविराज काळे यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व विकासात्मक कामांमुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी मिळवला आहे. सामान्य नागरिकांसाठी नेहमी उभे राहिल्यामुळे आणि पारदर्शक कामकाजामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक २६ मध्ये स्वच्छ, सक्षम व जबाबदार प्रशासन देण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीचा प्रचार अधिक जोमाने सुरू असून, येणाऱ्या काळात नागरिकांचा हा विश्वास मतांच्या रूपाने व्यक्त होईल, असा पक्षाला ठाम विश्वास आहे.