पिंपरी | एकता प्रतिष्ठाणच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन
Updated On:

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – एकता प्रतिष्ठाण डोणे मावळ यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाची सखोल माहिती व वार्षिक दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर सातकर, पाचाणे गावचे माजी सरपंच छबन महाराज कडू, पवनमावळ वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष विठ्ठल येवले, आढले बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नामदेव घारे पाटील, सरचिटणीस चंद्रकांत चांदेकर, माजी उपसरपंच पोपट वाडेकर, नथु कारके, सखाराम आरुठे, बाळु घारे, विलास वाघमारे, संदीप लांडगे, राष्ट्रवादी डोणेचे अध्यक्ष राहुल घारे पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर खिलारी, समीर खिलारी,ए कता प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळासाहेब घारे पाटील, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर, कार्याध्यक्ष विशाल कारके, सोमनाथ खिलारी आदी उपस्थित होते.





