जुन्नर – जुन्नर तालुक्यात गुरूवारी (दि. २०) तब्बल ३८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यामुळे बाधितांचा एकूण आकडा ६९८ झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे. तर नारायणगाव येथे एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यु झाल्यामुळे एकूण बळींची संख्या ३१ वर पोहोचली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी नारायणगाव शहरात बारा तर जुन्नर शहरात सहा रुग्ण आढळले आहेत. ओतूर व शिरोलीमध्ये प्रत्येकी तीन तर पिंपरीपेंढार व येडगाव येथे प्रत्येकी दोन बाधित आढळले आहेत. वारूळवाडी, आळेफाटा, येणेरे, काळवाडी, निरगुडे, वडज, उंब्रज, रोहकडी, शिंगवे व आळे याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. या ६९८ बाधितांपैकी ५०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १६६ रुग्ण लेण्याद्री, नारायणगाव व पुणे येथे उपचार घेत आहेत.