Rohit Sharma Viral Video : आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा (Rohit Sharma Viral Video) आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले असून, त्यात केवळ २ विजय मिळवले आहेत, तर ५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा (Rohit Sharma Viral Video) पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुरुवारी (२९ एप्रिल) आपल्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोहित शर्मा फलंदाजीत (Rohit Sharma Viral Video) नेहमीच आक्रमक आणि प्रभावी खेळ दाखवतो, पण त्याच्या फिटनेसबाबत गेल्या काही वर्षांत वारंवार चर्चा आणि ट्रोलिंगही होत आले आहे. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितनी आपल्या फिटनेसवर विशेष मेहनत घेतली. आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला रोहित शर्माला उत्तम सुरुवात मिळाली होती. त्याने सुरुवातीच्या काही सामन्यांत चांगली फलंदाजी करत ऑरेंज कॅपवरही कब्जा केला होता. पण नंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला काही सामने खेळता आले नाहीत. दुखापतीतून सावरण्यासाठी रोहित सध्या फिटनेस ट्रेनिंगवर भर देत आहेत आणि लवकरात लवकर संघात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. Rohit Sharma Viral Video रोहित शर्मा केवळ मैदानावरील कामगिरीसाठीच नव्हे, तर आपल्या रिलॅक्स्ड आणि मजेशीर स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तो मुंबई इंडियन्सचा सहकारी शार्दुल ठाकूर याच्यासोबत जिममध्ये मजा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शार्दुल ठाकूर जिममध्ये ट्रेनिंग घेत असताना रोहित त्याची नक्कल (मिमिक्री) करताना दिसत आहे. हा व्हिडीओ रोहित शर्मानी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. View this post on Instagram A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) रोहितनी (Rohit Sharma Viral Video) या व्हिडीओला “Stretching my hammy with Lord!” असे कॅप्शन दिले आहे. ‘लॉर्ड’ हे शार्दुल ठाकूरचे लोकप्रिय टोपणनाव आहे. व्हिडीओत रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग करताना शार्दुलची नक्कल करताना दिसत आहे हे पाहून शार्दुलला देखील हसू आवरता आलेले नाही. या मजेदार क्षणांवर नेटिझन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंगने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आतापर्यंत या व्हिडीओला अडीच मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.