Pakistan Player on Indian Bowlers : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांतील तीव्र स्पर्धा सर्वांनाच परिचित आहे. दोन्ही संघांमधील लढती केवळ मैदानावरील कामगिरीमुळे (Pakistan Player on Indian Bowlers) नव्हे, तर खेळाडूंच्या वक्तव्यांमुळे, हावभावांमुळे आणि मैदानाबाहेरील घटनांमुळेही नेहमी चर्चेत राहतात. अलीकडेच, युवा पाकिस्तानी फलंदाज हसन नवाझ याने भारतीय गोलंदाजांबाबत केलेल्या जहाल विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या पार्श्वभूमीवर एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हसन नवाझला (Pakistan Player on Indian Bowlers) विचारण्यात आले की, जगातील कोणत्या गोलंदाजांविरुद्ध त्याला सर्वाधिक धावा करायच्या आहेत. यावर उत्तर देताना त्याने भारतीय गोलंदाजांवर तीव्र टीका केली. “भारताविरुद्ध खेळताना आम्हाला नेहमीच त्यांच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ करण्याची इच्छा होते. हे अगदी सोपे आहे त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाबद्दल आम्हाला तिरस्कार वाटतो. देवाची इच्छा असेल आणि संधी मिळाली तर भविष्यात आम्ही त्यांच्याविरुद्ध अधिकाधिक धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच करू,” असे नवाझ म्हणाला. Pakistan Player on Indian Bowlers त्याने पुढे सांगितले की, भारताविरुद्ध खेळताना त्याला (Pakistan Player on Indian Bowlers) नैसर्गिकरित्या अधिक प्रेरणा आणि आक्रमकता मिळते. मात्र, आतापर्यंत भारताविरुद्ध त्याची कामगिरी फारशी लक्षवेधी राहिलेली नाही. तो फक्त एकच आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध खेळला आहे, ज्यात तो केवळ ५ धावांवर बाद झाला होता. Hasan Nawaz said, “I think we’ve to attack the Indian bowlers. I hate every single bowler on the Indian team.” (Qadir Khawaja) pic.twitter.com/kBvSb8MT74 — Sheri. (@CallMeSheri1_) April 27, 2026 हसन नवाझने (Pakistan Player on Indian Bowlers) २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०.७७ च्या सरासरीने आणि १५४.३९ च्या स्ट्राइक रेटने ४५७ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतके आणि एक शतकाचा समावेश आहे. पीएसएल २०२६ मध्ये मात्र त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चमकदार राहिली नाही. १० सामन्यांमध्ये त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली आणि एकूण २९१ धावा केल्या. यापूर्वी आशिया चषक २०२५ दरम्यान दोन्ही संघांमधील वातावरण अत्यंत तापले होते. पाकिस्तानकडून भारताच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने पाकिस्तानशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. नाणेफेकीदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्येही तणाव दिसून आला होता. परिणामी, मैदानावरील वातावरण अधिक चिघळले आणि आयसीसीने दोन्ही संघांच्या काही खेळाडूंवर कारवाईही केली होती.