कुमारस्वामी सरकार पाडण्यात अमित शहांचा सहभाग!

येडीयुरप्पा यांचा व्हिडिओ व्हायरल, भाजप कार्यकर्ते प्रचारास उत्सुक नसल्याचे चित्र
बंगळुरू : जनता दल धर्मनिरपेक्ष आणि कॉंग्रेस सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आखलेल्या ऑपरेशन कमळमध्ये पक्षाने आपली भूमिका बजावली होती, हे मान्य करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपापुढील अडचणीत वाढ झाली आहे.
हुबळी येथील पक्षाच्या बैठकीत येडीयुरप्पा यांनी केलेल्या भाषणाची ही सात मिनिटांची क्लिपआहे. या क्लिपमध्ये येडियुरप्पा हे अखेरच्या काही सेकंदात दिसतात. बाकी बहुतांश क्लिप ही त्यांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप आहे. त्यात त्यांनी पराभूत उमेदवारांपासून त्यांचे कॉल न लपवून ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हुबळीतील हॉटेल डेनिसनमध्ये 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 15 जागांच्या पोटनिवडणुकीच्या नियोजनासाठी बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या विधान परषदेच्या काही जागांसाठी उमेदवारांच्या निवड प्रक्रियेतही सहभाग घेतला. ते पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही उपस्थित होते.
येडीयुरप्पा म्हणतात, तुम्ही सर्व जण ज्या पध्दतीने बोलत आहात, त्यावरून तुम्हाला हे सरकार चालवण्यात काहीही स्वारस्य नाही, असे वाटते. ही पोटनिवडणूक जिंको अथवा हारो तो वेगळा मुद्दा आहे. पण तुमच्या पैकी कोणीही या कसोटीच्या काळात आम्ही पराभूत आमदारांसोबत आहोत असे म्हणत नाही, असे सांगून त्यांनी 17 आमदार फोडताना पक्ष नेतृत्वाने केलेल्या कमगिरीची आठवण या क्लिपमध्ये आहे.
ते म्हणातात, तुम्हाला सर्वांना 17 आमदरांचा निर्णय माहित आहे, बरोबर? या खोलीत असलेल्या सर्वांना समजायला पाहिजे की तो फक्त येडियुरप्पा यांचा निर्णय नव्हता. तर त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा होता. अडीच महिने ते मतदार संघात गेले नाहीत की कुटुंबियांना भेटले नाहीत. ते फक्त तेथे राहिले. आम्ही विरोधक म्हणून काम करत होतो. पुढील तीन चार महिने विरोधात होतो. त्यानंतर आपण सत्तेत आलो. तुम्ही लंबीचौडी भाषणे देता पण कधी त्यांच्या जागी जाऊन विचार केला आहे.? तुम्ही त्यांच्या विरोधात बोलता हे कितपत योग्य आहे.
(पक्षांतर करणाऱ्या आमदारांना) त्यांना मी विश्वसात घेतले आणि मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलो, आता मला मी अपराधी असल्यासारखे वाटत आहे. तुम्ही सगळे जण त्यांना निवडून आणणे कठीणअसल्याचे सांगत आहात. पण, आपल्या विश्वासावर आमदार पदाचा राजिनामा देऊन त्यांनी चूक केली की काय? त्यांना विजयी करण्यासाठी कंबर कसून कामाल लागू, असे तुमच्यापैकी लहान थोर कोणीही नेता बोला नाही याचे मला वैष्यम्य वाटते.
या व्हिडिओतून कॉंग्रेस, जनता दल(सं) यांचे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी कट रचल्याच पुरावा या व्हिडिओतून मिळाला आहे. तो घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. तर भाजपाने ऑपरेशन कमळ आणि आमदारफोडीच्या अनैतिक कृत्याची कबुली या व्हिडिओतून दिली आहे. त्यात अमित शहा यांनी या आमदारांची मुंबईत अडीच महिने व्यवस्था केल्याचे स्पष्ट होत आहे, असे ट्विट कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी केले आहे. या टेपमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाचा थेट उल्लेख आहे. त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. आम्ही म्हणत होतो ते खरे होते याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा हवा, असे राव म्हणाले.





