तो मी नव्हेच… जो मुक्त संचार करतोय भीतीविना जो सारखंच बाहेर पडतोय…. तो मी नव्हेच… जो कंटाळलाय घरात बसुन म्हणून मित्र मंडळींना भेटतोय… तो मी नव्हेच… भाजी, फळं नी, किराणा काय रोज आणावा लागतो काय? मेडिकल शॉपमध्ये रोजच असत काम काय? डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी जीवाचं आपल्या रान करताहेत… त्यांचे कुटुंब धोक्यात टाकून तुमची सेवा करताहेत… चौकात बसून गप्पा मारतोय, बाजारात गर्दी करतोय… तो मी नव्हेच… मास्क विना फिरतोय… तो मी नव्हेच… सॅनिटायझर टाळतोय.. तो मी नव्हेच… गर्दीचा भाग… तो मी नव्हेच… कसेही वाग… तो मी नव्हेच… मग मी आहे तरी कोण…? एक जबाबदार नागरिक, स्वच्छतेचा पुजारी, आणि मन बुद्धी ने सक्षम असा विवेकी त्रिकोण…. डॉ. पल्लवी चेडे , नगर, संपर्क: 9403391912