करोनामुळे युरोपातील मुत्यूचा आकडा 75 हजारावर
रोम : ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांनी करोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीशी लढण्याची आग्रही भूमिका ईस्टर निमित्ताने मांडली. जगातील कोट्यवधी लोकांनी घरातील लॉकडाउनमधून इस्टर रविवार साजरा केला. करोनामुळे युरोपातील मृत्यूची संख्या 75,000 वर पोहोचली.
इटलीपासून पनामा आणि फिलीपाईन्सपर्यंत ठिकठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे ईस्टरच्या विशेष समारंभाच्या दिवशीही चर्चमध्ये कोणीही भाविक उपस्थित राहू शकले नव्हते. धार्मिक नेत्यांनीही धार्मिक प्रवचनांना भाविकांपर्यंत पोहोचवण्यसाठी सोशल मिडीयासारख्या आधुनिक मार्गांचा अवलंब केला.
जवळपास रिक्त असलेल्या सेंट पॉलच्या कॅथेड्रलमधून बोलताना, पोप फ्रान्सिस यांचा इस्टर संडेचा संदेश सर्व ठिकाणच्या आजारावर केंद्रित होता आणि त्यांनी आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आपल्या संदेशातून केले. त्यांनी विषाणूला तोंड देण्यासाठी युरोपियन नागरिकांना एकता राखण्याची विनंती केली,
जगभरात विषाणूचा प्रभाव असलेल्या देशांमध्येही ईस्टरचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र अधिक प्रभाव असलेल्या देशांतील नेत्यांनी संसर्ग होण्याचे प्रमाण आता शिगेला जाऊ शकते, असा धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष चर्चमध्ये कोणीही आलेले नव्हते. जगातील अर्ध्याहून अधिक म्हणजे चार अब्जाहून अधिक लोक लॉकडाउनमध्ये आहेत. अमेरिकेत आता सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.