85 हजारांचा ऐवज लंपास
मंचर- आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मण्यांची पोत आणि एकलहरे येथून मोबाईल असा एकुण 85 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) पहाटे घडली.
चांडोली बुद्रुक येथील शेतकरी सदाशिव कोंडाजी थोरात हे पत्नी शारदा सदाशिव थोरात, मुलगा गणेश थोरात, सून काजल थोरात, आई रखमाबाई कोंडाजी थोरात यांच्यासह राहतात. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवन करुन रात्री दहा वाजता आई रखमाबाई थोरात या बाहेरील रुममध्ये झोपल्या होत्या. बाहेर अंगणात सदाशिव कोंडाजी थोरात हे झोपले होते. त्यांनी घराचा दरवाजा लोटून घेतला होता. पत्नी शारदा थोरात, मुलगा गणेश थोरात आणि सून काजल थोरात हे आतमधील रुममध्ये झोपले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजाचा उघडल्याचा आवाज आल्याने सदाशिव थोरात जागे झाले. त्यावेळी त्यांना सोन्याच्या मणंयाची पोत चोरीला गेल्याचे दिसून आले.
तसेच एकलहरे गावातील अभिषेक अशोक फलके यांच्या घरात खिडकीच्या बाजूला ठेवलेला 40 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एस. टेन प्लस फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. चोरीची फिर्याद शेतकरी सदाशिव थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले करीत आहेत.