Tulsi Gabbard Resigns : तुलसी गबार्ड यांचा राष्ट्रीय गुप्तचर विभाग संचालकपदाचा राजीनामा; काय घडलं नेमकं?
ट्रम्प प्रशासनाकडून नियुक्त झालेल्या तुलसी गबार्ड (Tulsi Gabbard Resigns) यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

Tulsi Gabbard Resigns : ट्रम्प प्रशासनाकडून नियुक्त झालेल्या तुलसी गबार्ड (Tulsi Gabbard Resigns) यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. गबार्ड यांच्या पतीला हाडांचा कर्करोग झाला असल्यामुळे पतीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे गबार्ड यांनी म्हटले आहे.
दिनांक ३० जून २०२६ पासून आपण पदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे गबार्ड (Tulsi Gabbard Resigns) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे.गबार्ड या ट्रम्प यांच्याशी मतभेद होऊनच प्रशासनातून बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या प्रशासनातच मतभेद निर्माण झाले होते. ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळातून बाहेर पडणाऱ्या गबार्ड (Tulsi Gabbard Resigns) या चौथ्या सदस्या आहेत. गबार्ड यांच्या आगोदर जो केंट यांनी मार्च महिन्यात नॅशनल काऊंटर टेरेरिझम सेंटरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
सद्सद्विवेकबुद्धीने युद्धाला पाठिंबा देऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. होमलॅन्ड सिक्युरिटी मंत्री क्रिस्टी नोएम यांनाही इमिग्रेशनच्या मुद्द्यावर नेतृत्वावर टीका केल्यामुळे त्यांना पद सोडावे लागले होते. तर जेप्री एप्सटीनशी संबंधित प्रकरणांच्या फायलींची न्याय विभागाकडून होत असलेल्या हाताळणीवर टीका झाल्याने ऍटर्नी जनरल पाम बोंडी यांनीही राजीनामा दिला होता.
गबार्ड या पूर्वाश्रमीच्या डेमोक्रॅटिक कॉंग्रेस सदस्या आहेत. त्यांनी विदेशातील युद्धाला विरोधच केला होता. मात्र अमेरिकेने इस्रायलबरोबर मिळून इराणवर हल्ला केल्याने त्यांना नाराज व्हावे लागले होते. मार्च महिन्यात झालेल्या संसदीय सुनावणीच्यावेळी त्यांनी इराणमधील युद्धाला विरोधाची भूमिका घेतली होती.
व्हाइट हाउसने या युद्धाच्या परिणामांची तयारी केली आहे का? असा प्रश्न त्या सातत्याने उपस्थित करत होत्या. गेल्या वर्षी अमेरिकेने इराणच्या अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले केले, तेंव्हा इराण अण्वस्त्रे तयार करण्याच्या तयारीत असल्याची कोणतीही गोपनीय माहिती उपलब्ध नसल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.






