Jeffrey Epstein Baby Ranch: जगातील सर्वात श्रीमंत, शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तींच्या वर्तुळात वावरणारा कुख्यात फायनान्सर जेफ्री एपस्टीन याच्या मृत्यूला सहा वर्षे उलटली असली, तरी त्याच्या पापांचा घडा आता फुटू लागला आहे. अमेरिकन न्याय विभागाने (US Justice Department) सार्वजनिक केलेल्या ३० लाख पानांच्या कागदपत्रांमुळे एका अशा क्रूर योजनेचा पर्दाफाश झाला आहे, ज्याला ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या योजनेचे नाव आहे – ‘बेबी रांच’ (Baby Ranch). काय होते हे ‘बेबी रांच’ प्रकरण? जेफ्री एपस्टीन केवळ लैंगिक शोषणाच्या जाळ्यात अडकला नव्हता, तर त्याला मानवी उत्क्रांतीसोबत खेळ करून ‘मानवी शेती’ करायची होती, असे या कागदपत्रांतून समोर आले आहे. न्यू मेक्सिकोमधील त्याच्या हजारो एकरमध्ये पसरलेल्या ‘झोरो रांच’ (Zorro Ranch) या निवासस्थानी तो ही भयानक योजना राबवू इच्छित होता. एपस्टीनची क्रूर योजना – एपस्टीनला स्वतःच्या डीएनएपासून शेकडो मुले जन्माला घालायची होती. त्याने अनेक वैज्ञानिकांशी चर्चा केली होती की, एकाच वेळी अनेक महिलांना त्याच्या खासगी ठिकाणी ठेवून त्यांना गर्भवती कसे करता येईल. त्याला वाटत होते की त्याचे ‘जीन्स’ श्रेष्ठ आहेत आणि त्यातून तो एक प्रगत मानवी जात तयार करू शकतो. या विचारसरणीला विज्ञानाच्या भाषेत ‘युजेनिक्स’ (Eugenics) म्हटले जाते, ज्याचा वापर इतिहासात अनेक हुकूमशहांनी केला होता. हेही वाचा – Share Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी; गुंतवणूकदारांची एकाच दिवसात 6 लाख कोटींची कमाई पावरफुल लोकांचे कनेक्शन: नावे ऐकून जग अवाक – एपस्टीनच्या या काळ्या साम्राज्यात केवळ तो एकटा नव्हता. सार्वजनिक झालेल्या फाईल्समध्ये आणि जुन्या रेकॉर्ड्समध्ये जगातील दिग्गज नेत्यांची आणि उद्योगपतींची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स आणि एलॉन मस्क यांच्या नावांचा संदर्भ आला आहे. जरी यातील बहुतांश व्यक्तींनी एपस्टीनसोबत केवळ व्यावसायिक किंवा सामाजिक संबंध असल्याचे सांगत गुन्ह्यात सहभाग नाकारला असला, तरी इतके मोठे लोक एका गुन्हेगाराच्या संपर्कात का होते, यावरून जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. तपासाची टाइमलाइन: २००५ ते २०२६ २००५-०८: फ्लोरिडामध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू. एपस्टीनला कमी कडक शिक्षा झाली, ज्यामुळे संशय वाढला. २०१९: पुन्हा अटक झाली, मात्र न्यूयॉर्कच्या जेलमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. सरकारने याला आत्महत्या म्हटले, पण अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. २०२५-२६: अमेरिकन प्रशासनाने प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि लाखो कागदपत्रे सार्वजनिक केली, ज्यातून ‘बेबी रांच’चे सत्य जगासमोर आले. ZP Election Result 2026: 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर; जिल्हानिहाय पक्षीय बलाबल पाहा, कुठे कोणाची सत्ता? सत्य की कल्पना? तपासाधिकाऱ्यांच्या मते, ‘बेबी रांच’ प्रत्यक्षात पूर्णपणे कार्यान्वित झाल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. मात्र, एपस्टीनच्या डायरीतील नोंदी आणि त्याने काही वैज्ञानिकांशी केलेला संवाद हे सिद्ध करतो की, हा केवळ विचार नव्हता तर तो त्यासाठी पूर्वतयारी करत होता. काही पीडितांनी दावा केला आहे की, तिथल्या हालचाली अत्यंत रहस्यमयी होत्या. दरम्यान, जेफ्री एपस्टीनचा अंत झाला असला, तरी त्याने विणलेले हे जाळे किती खोलवर होते, हे आता स्पष्ट होत आहे. ‘बेबी रांच’ ही संकल्पना आधुनिक काळातील सर्वात क्रूर आणि अमानवीय विचारांपैकी एक मानली जात आहे.