अग्निशामक दलाचे जवान ठरले “देवदूत’; ड्रेनेजमध्ये अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका

Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पिंपरीच्या खराळवाडी भागात शनिवारी (दि. 16) सकाळी एक गाय ड्रेनेजमध्ये अडकली होती. नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाने गायीला सुखरूपरित्या बाहेर काढले. मात्र अग्निशामक दलाच्या “देवदूत’ नावाच्या वाहनातून आलेले जवान त्या गायीसाठी “देवदूत’ ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ,

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.10 वाजताच्या सुमारास खराळवाडी येथील सोनरुपा अपार्टमेंट नजीक सार्वजनिक शौचालयाजवळील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाय अडकली असल्याची माहिती मुख्य अग्निशमन केंद्रास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाच्या “देवदूत’ या वाहनातून अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही स्थानिक नागरिक गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते.
खराळवाडी प्रतिबंधित परिसर असल्याने अग्निशामक दलाने घटनास्थळावरील अनावश्‍यक गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी ड्रेनेज चेंबरच्या कडेच्या तुटलेल्या लोखंडी सळया आणि सिमेंट बाजूला केले. दोन रेस्क्‍यू बेल्ट गाईच्या पोटाशी अडकवण्यात आले. ते बेल्टचे लूप मजबूत बांबूमध्ये अडकवून अग्निशमन कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी एकत्रितपणे गाईला सुखरूप बाहेर काढले

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

War Updates: इराणचा इस्रायलवर भीषण पलटवार! बंदराजवळ जहाजावर ड्रोन हल्ला; 'MSC Ishyka' आगीच्या भक्ष्यस्थानी

2026-04-04 22:08:16

War Updates: इराणचा इस्रायलवर भीषण पलटवार! बंदराजवळ जहाजावर ड्रोन हल्ला; 'MSC Ishyka' आगीच्या भक्ष्यस्थानी

Smart City Initiatives Fail : स्मार्ट सिटीचे पाप महापालिकेच्या माथी; गैरव्‍यवहाराबाबत तक्रारी

2026-04-01 08:13:59

Smart City Initiatives Fail : स्मार्ट सिटीचे पाप महापालिकेच्या माथी; गैरव्‍यवहाराबाबत तक्रारी

PCMC : पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

2026-04-01 07:56:36

PCMC : पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Satara News : तासवडे एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

2026-03-30 11:35:01

Satara News : तासवडे एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Pimpri : धक्कादायक! वडिलांनी मोबाईल तपासल्याने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल 

2026-03-23 13:58:20

Pimpri : धक्कादायक! वडिलांनी मोबाईल तपासल्याने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल