जीवनविमा घ्या संयुक्तपणे (भाग-२)

जीवनविमा घ्या संयुक्तपणे (भाग-१)

हप्ता कमी : संयुक्त जीवन विमा कवचाचा आणखी एक लाभदायक पैलू म्हणजे त्याचा हप्ता कमी असतो. जर आपण दोन पॉलिसी घेतल्या आणि त्याच्या हप्त्याची तुलना केल्यास संयुक्त पॉलिसी ही तुलनेने खूपच स्वस्त पडते. त्यात त्याचबरोबर दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याला विमा कवच प्रदान केला जातो. उर्वरित काळात विमा हप्ता भरण्याची देखील गरज पडत नाही.

उदाहरण लक्षात घ्या
तज्ज्ञांच्या मते, जर पतीचे वय 36 आणि पत्नीचे वय 35 असेल तर संयुक्त विमा योजना घेणे फायद्याचे ठरेल. पहिली संयुक्त योजना ही 50 लाख रुपयांची असावी आणि दुसऱ्याची 25 लाख रुपयांची. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला 50 लाख रुपये मिळेल आणि 25 लाख रुपयाचे कवच हप्त्याविना सुरू राहील.

किती बचत
जर एखादा 30 वर्षांचा युवक एक कोटीचा टर्म इन्शूरन्स घेत असेल तर त्याचा हप्ता वार्षिक 12 हजार रुपये असेल. त्याचवेळी 27 वर्षांची महिला एक कोटीचा विमा घेत असेल तर तिला 9500 रुपये भरावे लागतील. याप्रमाणे दोघांनी वेगवेगळी पॉलिसी घेतली तर वार्षिक 21,500 रुपये भरावे लागतील. त्याचवेळी एक कोटींचा संयुक्त विमा घेतल्यास त्यास 20 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. यानुसार वार्षिक दीड हजार रुपयांची बचत होईल.

गृहकर्जधारकांसाठी फायदेशीर
जर वैवाहिक जोडपे घर खरेदीसाठी संयुक्तपणे गृहकर्ज घेत असतील तर त्यांना संयुक्त विमा योजना घेणे गरजेचे आहे. यात दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे गृहकर्ज हे दोघांच्या नावाने असून दोघांनाही विमा सुरक्षा असणे आवश्‍यक आहे. जर अचानक काही दुदैंवी घटना घडली तर कोणा एकावर आर्थिक बोझा पडणार नाही.

मासिक भरपाईचा पर्याय
अनेक विमा कंपन्या संयुक्त पॉलिसीत एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर एक रक्कमी रक्कम देण्याचा किंवा मासिक भरपाईचा पर्याय ठेवतात. लाभार्थी हा विमा कवचची रक्कम एक रकमी किंवा दहा वर्षांपर्यत दरमहा घेऊ शकतो. संयुक्त विमा योजनात पालक हे आपल्या मुलाला नॉमिनी म्हणून नोंदवू शकतात. अशा स्थितीत आई-वडिलांचा मृत्यू झाल्यास विम्याची कवच पाल्याला मिळते. मुलगा देखील एक रकमी किंवा मासिक रूपात भरपाईची रक्कम घेऊ शकतो. प्राप्तीकरात सवलत : संयुक्त जीवन विम्याच्या हप्त्यावर प्राप्तीकराची सवलत मिळवू शकता. प्राप्तीकर कलम 80 सी आणि 10 (10ड) नुसार विमा धारकाला जमा केलेल्या हप्त्यावर करसवलत मिळते. संयुक्त जीवन विमाबरोबरच क्रिटीकल इलनेस देखील सहजपणे जोडता येऊ शकते.

– स्वरदा वैद्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)