निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-१)

खरंच, संभाव्यता व त्यानुसार मिळणारा नफा हा खरंच अनाकलनीय विषय आहे. समजा एखाद्यास विचारलं की पुढील आठवड्यात बाजार वर जाईल की खाली आणि जर त्याचं उत्तर ‘वरती’ असं असेल तर जितके पैसे तो बाजार वर जाणार या अपेक्षेनं लावेल त्याच्या कांही प्रमाणात त्यास परतावा मिळेल जो फार कांही आकर्षक नसेल. परंतु समजा त्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध जाऊन बाजार पडण्यावर लावलेले पैसे त्यास अधिक जास्त कमाई करून देऊ शकतील. यासाठी आपण क्रिकेट जगतातील सर्वांत गाजलेल्या मॅचचं उदाहरण घेऊयात.

१२ मार्च २००६ साली जोहान्सबर्गच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ४३४ धावा कुटल्या होत्या. साहजिकच त्या वेळेस ऑस्ट्रेलियाच जिंकणार हे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत होतं, समजा त्या वेळी जरऑस्ट्रेलिया जिंकणार म्हणून कोणी पैज लावायला आलं असतं तर ? त्याला कोणीही भाव दिला नसता कारण उघड-उघड दिसतंय की ही मॅच ऑस्ट्रेलियाच जिंकेल. परंतु ऑस्ट्रेलियाची इनिंग झाल्या झाल्या समजा कोणी सांगितलं असतं की दक्षिण आफ्रिका ही मॅच जिंकेल, तर त्याला वेड्यात काढून कोणीही त्याच्याशी पैज लावायला तयार झालं असतं. कारण ऑस्ट्रेलियावरील पैज हरण्याचा धोका हा अशक्य होता. परंतु सर्व सहज वर्तवलेल्या संभाव्यता खोट्या ठरवत दक्षिण आफ्रिकेनं ती मॅच १ चेंडू व १ गडी राखून जिंकली. क्रिकेट जाणकारांसाठी ही बाब नक्कीच आश्चर्यकारक होती. असंच अजून एक उदाहरण म्हणजे २००२ मधील नॅटवेस्ट सिरीजमधील लॉर्ड्सच्या मैदानावरील अंतिम सामना, इंग्लंडनं ठेवलेलं ३२६ धावांचं लक्ष्य व त्यासमोर भारताची २१ षटकांत १४६/५ अशी झालेली घसरगुंडी, ज्यात गांगुली, सेहवाग, तेंडूलकर, द्रविड असे सर्व महारथी परतले होते. त्या क्षणाला भारतीय क्रिकेटचे निस्सीम भक्त देखील मूग गिळून गप्प होते. परंतु तरीही तो सामना व ती सिरीज भारतानं जिंकली. वास्तव अशक्य पण सत्य होतं. म्हणजेच वर म्हटल्याप्रमाणं probability doesn’t matter but Pay-Offs do ! म्हणजेच, संभाव्यता काही मायने ठेवीत नाही परंतु मिळणारा नफा हाच महत्वाचा असतो.

पूर्वीच्या लेखातून एक बाब निदर्शनास आणून दिलेली होती की बाजारात तेजी गृहीत धरणारे जास्त खेळाडू आहेत त्याचं कारणही दिलेलं होतं की, ३ मे रोजी बाजार नरम बंद होत असताना देखील निर्देशांकाच्या बाबतीत म्हणजे निफ्टीच्या बाबतीत सर्वच कॉल ऑप्शन्समध्ये तेजी दिसून आलेली होती, जे सहसा घडत नाही. आणि त्याचा परिणाम आपणांस पुढील दोन आठवड्यात दिसलाच की निफ्टी ३ मे च्या बंद भावापासून ५ टक्क्यांच्यापेक्षा जास्त कोसळली.

निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-२)

निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-३)

आता याच अनुषंगानं मागील आठवड्यात निफ्टी ही सलग नऊ सत्रं (३० एप्रिल ते १३ मे) पडली होती व आतापर्यंत अशी वेळ केवळ एकदाच आलेली असल्यानं (२५ एप्रिल २०११ ते ५ मे २०११) निफ्टी सलग दहा दिवस पडझड नोंदवणार नाही या शक्यतेनं बाजारानं १४ मे रोजी उसळी मारली परंतु १५ मे रोजी बाजार बंद होता होता पुन्हा गटांगळी खाल्ली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)