निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-२)

निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-१)

आता या निवडणुकीसारख्या हंगामात, ट्रेडर्स हे संभाव्यतेवर जास्त भर देताना व त्याप्रमाणे आपले आडाखे बांधून पुढील डावपेच खेळताना दिसतात. नक्कीच यात गैर काहीच नाहीय परंतु खरी गुंतवणूक म्हणजे काही जुगार नव्हे. अशा ठिकाणी कधीच ‘हे’ नाहीतर ‘ते’ अशी परिस्थिती नसते, क्वचीतच अशी परिस्थिती (संधी) मिळू शकते. परंतु, प्राथमिकतः कोणत्याही ट्रेडर अथवा गुंतवणूकदारांनं अशीच रक्कम गुंतवावी अथवा ट्रेडिंगसाठी लावावी ज्यामुळं त्याच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्याचं अथवा तिचं आर्थिक भवितव्य देखील धोक्यात येऊ शकणार नाही. म्हणजेच, Never bet the amount that you can’t afford to lose, दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर जितकी रक्कम आपण सहज गमावू शकतो तितकीच रक्कम ट्रेडिंगसाठी गुंतवणूक म्हणून वापरावी.

अशा ट्रेड्ससाठी मागील लेखात म्हटल्याप्रमाणं सोप्या शब्दांत लॉटरीची उपमा चपखल बसते. येत्या आठवड्यात लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडं सर्वांचेच डोळे लागले आहेत. काही खात्री बाळगून आहेत तर काही आशंका. कांही अजूनही अनिश्चिततेत तर कांही नुसतेच शक्यता पडताळून पाहत आहेत. आता संभाव्यतेच्या नियमानुसार तुमच्या मनासारखं न होण्याची शक्यता असल्यास तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक करणार का ? याचं उत्तर मिळणाऱ्या नफ्यामध्ये आहे. खालील उदाहरण हा खूप चांगला व्यवहार (ट्रेड) ठरणार नाही.

आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता १/४ म्हणजे एकूण इतर तीन शक्यता असताना, माझी चौथी. प्रत्येक शक्यतेवर केली जाणारी गुंतवणूक रु. ५०००. माझ्या अपेक्षेप्रमाणं गोष्टी घडल्यास मिळणारा नफा रु. १०,०००. म्हणजेच २०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर रु. १०,००० परतावा.

आता हे उदा.किफायतशीर ठरू शकतं – आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता १/४. प्रत्येक शक्यतेवर केली जाणारी गुंतवणूक रु. ५०००. माझ्या अपेक्षेप्रमाणं गोष्टी घडल्यास मिळणारा नफा रु. ५०,०००. म्हणजेच २०,००० रुपयांच्या एकूण गुंतवणुकीवर रु. ५०,००० परतावा.

निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-३)

वरील उदाहरण लक्षात घेऊन या वेळेची घटना पाहता, प्रामुख्यानं तीन शक्यता गृहीत धरता येऊ शकतात. विद्यमान सरकार पुन्हा सत्तेत येणार, सरकार बदल परंतु स्थीर सरकार आणि कोणतेही सरकार परंतु अस्थिर सरकार. यांपैकी पहिली शक्यता गृहीत धरल्यास बाजार जोरानं उसळी मारेल असा सर्वांचा अंदाज आहे. दुसऱ्या शक्यतेच्या बाबतीत देखील बाजार निराश करणार नाही परंतु तिसरी शक्यता गृहीत धरल्यास बाजार आपटी खाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)