कोविड विरुद्धच्या झायडस कॅडिला या कंपनीने आपल्या झायकोव्ह-डी या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. भारत बायोटेकनंतर लस तयार करणारी ही दुसरी भारतीय कंपनी आहे. झायडस कॅडिला आणि जैवतंत्रज्ञान संशोधन परिषद संयुक्तरित्या ही लस विकसित करत आहेत.
झायकोव्ह-डी या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निरोगी मानवावर चाचण्या सुरू झाल्या असल्याचे जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेने म्हटले आहे. या टप्प्यात लसीची सुरक्षितता, प्रतिकारकशक्ती निर्माण करण्याची क्षमता, प्रमाण तपासले जाईल.
प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचे जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेने सांगितले आहे. झायकोव्ह-डी लसीच्या मानवी चाचण्या सुरू होणे हा आत्मनिर्भर भारत योजनेतला मैलाचा दगड असल्याचे जैवतंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी म्हटले आहे.
ही लस करोनाची साथ परतवून लावायला भारताला स्वावलंबी बनवेल, असे मत झायडस कॅडिलाचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी व्यक्त केले आहे.