झुंज देण्यापरी पर्याय कोणता राहिला
दिवसामागून दिवसाने अंत माझा पाहिला
उसणं अवसान आणून, प्रयत्नांचा भडिमार केला
परिस्थितीने मात्र पायात काटा रोवला
जे न व्हावे कधी असेच नेमके घडले
साथ हवी ज्या मोत्यांची ते सारेच निखळले
ठेवुनी मनी विश्वास, दैवास ही होते दिरंगाई
पुन्हा उचलतो शस्त्र, लढण्या ही अस्तित्वाची लढाई
-अक्षय भिंगे
Quality content