मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले होते तर आता या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.
‘झुंड नहीं कहिए.. टीम कहिए सर..’ हा संवाद सुरुवातीला ऐकायला मिळतो आणि काही मुलांची टीम हातांमध्ये विविध शस्त्र घेऊन जात असते. १ मिनिट १२ सेकंदांच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. दरम्यान, नागराज मंजुळेचा आगामी ‘झुंड’ सिनेमालाही सैराटप्रमाणेच रसिकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.