झुबिन नौटियालचे “मेरी आशिकी’ हीट

बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक झुबिन नौटियालचे आणखी एक जबरदस्त गाणे रिलीज झाले आहे. “काबिल हूं’ आणि “लो सफर’सारख्या जबरदस्त हिट गाणे देणारे झुबिन नौटियाल “मेरी आशिकी’ हे आणखी एका रोमॅंटिक गाणे घेऊन आले आहेत. हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरले आहे. हे गाणे 2 जून रोजी यूट्यूबवर रिलीज झाले असून ते खूप व्हायरल होत आहे.

या गाण्याला आवाज देत झुबिन नौटियालने स्वत: परफॉर्मही केले आहे. त्याचबरोबर या गाण्याला रोचक कोहलीने संगीत दिले आहे. या संपूर्ण गाण्यामध्ये एक सुंदर अशी प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. या गाण्यात झुबिन नौटियालसोबत पंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री इहाना ढिल्लन झळकली आहे. या गाण्यात इहाना खूपच सुंदर दिसत आहे. या गाण्यात झुबिन आणि इहानाशिवाय अल्तमाश फराजही दिसला आहे.

दरम्यान, फक्‍त 24 तासांत हे गाणे तब्बल 4 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. भूषण कुमारच्या टी-सीरिज बॅनरखाली हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे लॉकडाऊनच्या काही दिवस आधी मेघालयातील एका छोट्या गावात शूट करण्यात आले होते. झुबिनच्या चाहत्यांसाठी लॉकडाऊनच्या दरम्यान हे गाणे रिलीज होणे एक मोठी भेट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.