अध्यक्ष निर्मला पानसरे : खेड तालुक्यातील 450 शिक्षकांचे हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात श्रमदान
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, याबरोबरच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आगामी काळात सोडवले जातील. जिल्हात स्वछता अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले.
खेड पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात स्वछता अभियान राबविले. त्याचा शुभारंभ निर्मला पानसरे यांच्या हस्ते झाला, तत्पूर्वी त्यांचा तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्यल्.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे, तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे, राज्य शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष राजेश कांबळे, शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहरे, तालुका अध्यक्ष विठ्ठल तांबे, बबन गावडे, सुरेश आदक, जालिंदर दिघे, धर्मराज पवळे आदी उपस्थित होते. निर्मल पानसरे म्हणाल्या की, राजगुरूनगर येथे मोठे क्रीडासंकुल तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धासाठी योग्य क्रीडा व्यासपीठ मिळाले आहे. पुढील वर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या संकुलात घेतल्या जातील.
दरम्यान, तालुक्यातील 402 शाळेच्या सुमारे 450 शिक्षक व अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलात प्रत्यक्षात श्रमदान केले. या कार्यक्रम संयोजन विस्तार अधिकारी संजीव टेंभे, तिन्हेवाडी शाळा क्र 1 च्या मुख्याध्यापक सुनंदा पाटोळे, क्र. 2 चे मुख्याध्यापक ईश्वर फदाले, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आरती टेंभूरकर, विकास अरुडे, बाळासाहेब बारवेकर, अशोक मोरे, सुनील पवार, अलका डफळ, रेखा लांडे, सुरेश आदक, दत्ता तिटकारे, यांनी केले.