चीनपासून सुरू झालेल्या करोना व्हायरमुळे संपूर्ण जग अस्वस्थ झाले आहेत. भारतातही दिवसेंदिवस करोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. परंतु हे युद्ध लढल्यानंतर असे बरेच लोक आहेत जे परत आपल्या घरी गेले आहेत. करोना टाळण्यासाठी अद्याप कोणतीही लस नाही.
परंतु डॉक्टर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार करत आहेत. चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची कन्या शाजा मोरानीनंतर आता दुसरी मुलगी झोया मोरानीने करोनाचा पराभव करत ही लढाई जिंकल्यानंतर तिने प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दिला होता. यानंतर तिने पुन्हा एकदा प्लाझ्मा डोनेट केला आहे.
करोनाची लढाई जिंकल्यानंतर झोया मोरानी इतर रुग्णांनाही मदत करत आहे. ती स्वतःच्या परीने होईल तितके प्रयत्न करत जास्तीत जास्त लोकांना रोगातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, प्लाझ्मा देण्याची दुसरी फेरी झाली. शेवटच्या वेळी आयसीयूमधून एक रुग्ण बाहेर आला होता.
माझ्या डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की, करोनाशी लढाई जिंकणाऱ्या प्रत्येक रुग्णाने प्लाझ्मा दान केल्यास तो अन्य रुग्णांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.
दरम्यान, करीम मोरानी, शाजा मोरानी आणि झोआ मोरानी हे तिघेही करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर या तिघांनीही करोनावर मात करत ते घरी परतले होते. यापूर्वी झोआ मोरानीने नायर रुग्णालयात प्लाझ्मा दान केला होता.