झोमॅटो देणार 13 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ

सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात

नवी दिल्ली :  देशातली  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 17 मेनंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. देशात 14 एप्रिलपासून काही ठिकाणी अटी-शर्तींसह लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. त्यात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित काळजी घेऊन फूड डिलीवरी करण्यासाठी झोमॅटोलाही परवानगी देण्यात आली आहे. परंतु , झोमॅटो जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचे  स्पष्ट केले आहे.

झोमॅटोकडून याविषयी माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीत 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.’ यासंदर्भात अधिक माहिती देताना झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी असे म्हटले की, गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या व्यवसायाचे अनेक पैलू बदलले आहेत आणि यातील बरेच बदल कायमस्वरुपी होणार आहेत. तसेच “आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात काम मिळेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे कंपनीतील 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात करण्यात येणार आहे. त्यांना 24 तासाच्या आतमध्ये कंपनीच्या नेतृत्व टीमकडून झूम कॉल कडून निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलेले नाही पण त्यांच्यासाठी कंपनीकडे काम नाही आहे अशांना फक्त 50 टक्के पगार देण्यात येणार आहे.’

तसेच गोयल यांनी बोलताना सांगितले की, कर्मचाऱ्यांनी आपला पूर्ण वेळ आणि उर्जा नवी शोधण्यासाठी कामी लावावी. कंपनी जून महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करणार आहे. दरम्यान, सध्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अॅमेझॉन, डी-मार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, फ्लिपकार्ट, झोमॅटो यांसारख्या कंपन्या घरपोच किराणा सामान पोहोचवत आहे. नागरिकांनी घरात राहावं त्यामुळे घरपोच सेवा देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.