‘उबेर इट्स’ची झोमॅटोकडून खरेदी; ‘या’ कर्मचाऱ्यांच्या नौकरीवर टांगती तलवार

नवी दिल्ली –  ऑनलाईन फूड डिलेव्हरी व हॉटेल सर्च क्षेत्रात अल्पावधीत नावारूपास आलेल्या ‘झोमॅटो’ने आज याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या उबेर इट्स कंपनीला संपादित केले. वर्षभरापासून सुरु असलेल्या या व्यवहाराबाबत आज झोमॅटोने प्रथमच अधिकृतरीत्या घोषणा केली असून येथून पुढे ‘उबेर इट्स’ भारतातील सर्व सेवा खंडित करणार आहे.

झोमॅटो व उबेर इट्स दरम्यान झालेल्या ३५० मिलियन डॉलर्सच्या या व्यवहारानुसार उबेर इट्स आपले भारतातील सर्व ग्राहक, हॉटेल्स व वितरण भागीदार झोमॅटोकडे वळवणार आहे तर झोमॅटो उबेर इट्सला जवळपास  १०% शेअर्स देणार आहे.

या व्यवहारामध्ये झोमॅटो उबेर इट्समधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपल्याकडे रुजू करून घेणार नसल्याने जवळपास १०० अधिकाऱ्यांच्या नौकरीवर टांगती तलवार आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here