नवी दिल्ली – झोमॅटो कंपनीचा आयपीओ 14 जूलैपासून ग्राहकांना उपलब्ध होणार असून 16 जून पर्यंत यासाठी नोंदणी करता येईल. या माध्यमातून झोमॅटा 9,375 कोटी रुपये उभे करणार आहे. या अंतर्गत असलेल्या शेअरचा 72 ते 76 रुपये असा ठेवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये झोमॅटो कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती.
दोन जुलै रोजी सेबीने या आयपीओला मंजुरी दिली आहे. गेल्या काही वर्षापासून झोमॅटो कंपनीची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये बऱ्याच शहरातील नागरिकांनी या ऍपवरून अन्नपदार्थ मागितले.
झोमॅटोशिवाय स्विगी कंपनी या क्षेत्रात कार्यरत आहेत. सरलेल्या वर्षात झोमॅटोचा महसूल 2,906 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. तर ढोबळ नफा 2,200 कोटी रुपये इतका झाला आहे.